Home latest News Panvel news:पनवेलमध्ये सुकापुर येथे ” मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर संपन्न

Panvel news:पनवेलमध्ये सुकापुर येथे ” मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर संपन्न

213

पनवेलमध्ये सुकापुर येथे ” मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर संपन्न

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. क्र. 7715918136

पनवेल (panvel)( प्रतिनिधी ) सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन गोरगरीब गरजु रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करून त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे. त्यांचे आरोग्य सफल करत लोकसेवेतुन मानवी हित जोपासुन त्यांना चांगले उपचार मिळावेत आणि समाज व्याधी मुक्त असावा . सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक कार्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. सामान्य जनतेला उत्तम व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे , आरोग्य क्षेत्रातील उपक्रम समाजात राबवणे ही केवळ सेवा नसुन जनतेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी आहे. ह्या लोकभावनेतुन पनवेलमधील सुकापुर येथील सह्याद्री संस्थेने रविवार (sanday)दिनांक – 26 / 10 / 2025 रोजी सर्वसामान्य गरजु रुग्णांसाठी सर्वरोग निदान व मोफत उपचारांच्या महाशिबिराचे आयोजन केले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, पनवेलच्या सुकापुर येथील तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणात शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या(hospital) सहकार्याने विभागातील जनतेसाठी आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिबिर आयोजित केले होते.यावेळी सह्याद्री संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यादरम्यान विभागातील शेकडो नागरिकांनी शिबिरातील विविध मोफत सेवेचा लाभ घेतला. शुश्रुषा रुग्णालयाच्या डॉ. रत्नमाला मैडम यांनी रुग्णांवर विविध उपचार करून त्यांना आरोग्याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे डाॅ. दत्तात्रय वाघमोडे यांच्या पथकाने डोळे तपासून रुग्णांना मोफत चष्मा वाटप केले. तसेच बोरीवलीच्या डेफिन फाउंडेशनच्या वैशाली सावंत मैडम यांनी व त्यांच्या पथकाने महिलांना स्वयंरोजगार व व्यवसाय यावर मार्गदर्शन केले. शिबिरात महिला व बालरोग तज्ज्ञांनीही रुग्णांवर उपचार करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला. शिबिरात महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहुन आरोग्य सेवेचा पुरेपुर लाभ घेतला. त्याशिवाय सर्व रुग्णांना पंतप्रधान योजनेचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.

सदर शिबिराच्या कार्यक्रमाला चिपळे गावचे उपसरपंच धनंजय पाटील, अशोक शेगावकर, बौध्दजन पंचायत समितीचे गटप्रतिनिधी प्रमोद सावंत, शाखा क्रमांक 866 चे नागेश तांबे, तक्षशिला बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष गौतम उबाळे, वंचित बहुजन आघाडीचे अक्षय उबाळे, भारतीय बौध्द महासभेच्या छाया गवई , पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार करंदीकर, श्रामनेर व बौध्दाचार्य प्रसाद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम, प्रभाकर सावंत, वसंत भुजबळ, अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर मोफत आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे, सचिन सावंत, रुपाली पवार, सुजित मोहिते, अनिता साळवी, रुचिता मोहिते, साध्वी सावंत, श्र्वेता सावंत, वसंत खंडागळे, आशिष पवार, , पानेरी साळवे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.