भोकरदन तालुक्यातील नांजा येथे भारतीय सैन्य दलातील तीन सेवा निवृत झालेल्या वीर जवानांना भव्य सत्कार.
गोपीनाथ मोरे प्रतिनिधी 17 फेब्रुवारी
भोकरदन:- देश रक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बाजाव्लानंतर सैन्य दलातील सेवानिवृत झालेल्या नांजा येथील भारतीय सैनिकांचा गावकर्यांनी अनोख्या पद्दीतीने जल्लोष स्वागत केले. 17 फेब्रुवारी रोजी हा स्वागत समारोह झाला असून डी.जे लाऊन गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भोकरदन तालुक्यातील नांजा यथील श्री शिवाजी आनंदराव मोरे (बी.एस.एफ), श्री उत्तम पा काळे (बी.एस.एफ), श्री पुंडलिक दगडूबा मोरे(आर्मी) हे तीन जन सेवा निवृत झाले.
17 फेब्रुवारी रोजी आपल्या मूळ गावी नांजा येथे येणार असल्याने गावकर्यांनी त्यांचा स्वागताची जय्यत तयारी केली होती. सैनिकाचा सत्कार मा.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा हस्ते करण्यात आला. या वेळी जि प सदस्या सो. आशाताई पांडे पाटील उपस्थित होत्या. या वेळी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हजार होता. या वेळी ज्ञानेश्वर मोहन मोरे, उपसरपंच कय्युम शेख, संजय मोरे जनार्धन गाडेकर ,संतोष वाघ,गोपीनाथ मोरे, हिम्मतराव मोरे, कैलास फुके, गजानन मोरे (महाराज), मधुकर सोनुने, ज्ञानेश्वर कडूबा मोरे, प्रकाश सोनुने, रामकिसन मोरे, गणपत मोरे, बालाजी मोरे,कृष्ण शिंदे, शेख नयुम, शेख रौफ, प्रवीण आढावे, आकाश पांडे, सचिन मोरे, काकासाहेब सोनुने व अनेक जन हजार होते .