सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचा स्विकारला पदभार
म्हसळा: संतोष उद्धरकर.
म्हसळा: म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची पालघर इथे बदली झाली असून त्यांच्या जागी पालघर मधुन आलेले सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला असुन म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच म्हसळे करांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, रविंद्र पारेख हे महाराष्ट्र पोलीस दलातील अनुभवी अधिकारी असुन पालघर, धुळवड, विक्रमगड आदी ठिकाणी पारेख यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे, शिस्तप्रिय, दक्षता, तसेच गुन्हेगारी विरुद्ध कठोर भूमिका हे त्यांचे कार्यवैशिष्ट्य मानले जाते.
—————————————-
संदीप कहाळे यांनी चांगले काम केले आहे त्याच पद्धतीने काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती तुमच्या सहकार्याने साध्य होईल, चांगुलपणाचा सेतु आपण सगळे मिळुन बांधु तसेच कायदा हा सर्वांपेक्षा मोठा आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करु.
रविंद्र पारेख
सहायक पोलीस निरीक्षक, म्हसळा पोलीस ठाणे.









