सर्व मच्छिमारांनी सहकार्य करावे असे आवाहन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
८४२०३२५९९३
अलिबाग:- भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्था (ICAR-CMFRI) आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात पाचवी सागरी मत्स्य जनगणना २०२५ हाती घेण्यात येत असून, हा उपक्रम ३ नोव्हेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविला जाणार आहे.
या सर्वेक्षणामधून मिळणारे निष्कर्ष हे आगामी धोरणनिर्मितीसाठी तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शक ठरणार आहेत. यामुळे मच्छिमार समाजाच्या उपजीविकेला बळकटी मिळून देशाच्या अर्थविकासाला नवी दिशा मिळेल.
मत्स्य जनगणना शास्त्रीय पद्धतीने राबवण्यासाठी तज्ज्ञांची टीम विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करणार आहे.
या अभियानात सर्व मच्छिमारांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.









