Home latest News ब्रेनसेतू अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शैक्षणिक सेमिनार संपन्न

ब्रेनसेतू अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शैक्षणिक सेमिनार संपन्न

208

मेमरी आणि ब्रेन यामध्ये जो ब्रिज बनेल, तीच ब्रेनसेतू अकॅडमीचे कार्य आहे

संदेश साळुंके

कर्जत रायगड प्रतिनिधी 

९०१११९९३३ 

कर्जत : शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास, एकाग्रता वृद्धी आणि मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ‘ब्रेनसेतू अकॅडमी’ च्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त एक विशेष शैक्षणिक सेमिनार कर्जत येथील रॉयल गार्डन येथे दि. १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाला.

या सेमिनारमध्ये “मेमरी आणि ब्रेन यामध्ये जो ब्रिज बनेल, तीच ब्रेनसेतू अकॅडमीचे कार्य आहे” या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. या अभिनव उपक्रमामागे वीरेंद्र जाधव, विजय मोहिते, महेश खडे, सुप्रिया बोराडे आणि गायत्री जाधव या कार्यकारी मंडळाच्या एकत्रित परिश्रमांचा मोठा वाटा आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन खडे सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी वीरेंद्र जाधव होते. यावेळी गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेंदू प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले, तर महेश खडे यांनी अभ्यासपद्धती सुधारण्यासाठी आधुनिक स्मरणतंत्रांची माहिती दिली. उपस्थित विजय मोहिते आणि सुप्रिया बोराडे यांनी एकाग्रता आणि आत्मविश्वास वृद्धीबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेमिनार दरम्यान विद्यार्थ्यांनी संवादात्मक सत्रात भाग घेत आपल्या प्रश्नांना मार्गदर्शन घेतले.

‘ब्रेनसेतू अकॅडमी’त वयाच्या चार वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या प्रत्येकासाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. आठवड्यातून एक तास घेण्यात येणारा हा कोर्स सहा महिन्यांचा असून, त्याचे शुल्क ५९९९ रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षण दर रविवारी घेण्यात येणार असून, बालक, विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी मेंदू सक्रियता आणि स्मरणशक्ती वाढविण्याच्या विविध पद्धतींचा समावेश आहे.

अकॅडमीचे मुख्य केंद्र हिरानंदानी, पनवेल येथे असून, पुढील काळात प्रत्येक गावात शाखा सुरू करून हा उपक्रम व्यापक करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 8805333303 या क्रमांकावर किंवा info@brainsetuacademy.com

या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

या उपक्रमातून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला स्वतःच्या मेंदूची खरी क्षमता ओळखण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची आणि शिक्षण तसेच जीवनातील प्रगतीचा “ब्रेनसेतू” तयार करण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सेमिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त करत, “अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात नव्या पिढीचा दृष्टिकोन बदलून देशाचा बौद्धिक विकास अधिक वेगाने होईल,” असे मत व्यक्त केले.

ब्रेनसेतू अकॅडमीच्या माध्यमातून “शिक्षणातून स्मरण, स्मरणातून प्रगती आणि प्रगतीतून यशाचा सेतू” निर्माण करण्याची नवी दिशा समाजाला मिळेल, असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.