बनोटी गावात मोठ्या उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी
संतोष उध्दरकर
म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा: पांडुरंगाच्या दारी… उभा वारकरी… संपूर्ण महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात येत असतांना म्हसळा तालुक्यातील बनोटी गावात साक्षात पंढरी अवतरल्याचे काहिसे चित्र पहायला मिळाले, विठ्ठल रखुमाई मंदीराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, सकाळपासूनच काकड आरती, विठ्ठल रखुमाई मूर्ती वर दुग्धा अभिषेक, महादिंडी सोहळा, पालखी मिरवणूक, भजन किर्तन, सायंकाळी पारंपारिक शक्ती, तुरा जंगी सामना असा भरघोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बनोटी गावात अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण होऊन सर्व भाविक पांडुरंगाच्या चरणी लिन झाले होते. या सोहळ्याला माजी सभापती रविंद्र लाड, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, उपतालुका प्रमुख बाबु बनकर, युवा प्रमुख स्वप्नील चांदोरकर, साळविंडे विभाग प्रमुख नामदेव घुमकर, जेष्ठ पत्रकार उदय कळस, प्रमुख पवन भोई आदि मान्यवर उपस्थित होते. गावाच्या वतीने या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यक्रमासाठी विषेश सहकार्य करून शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अध्यक्ष देवजी गाणेकर, सचिव उत्तम गाणेकर, खजिनदार देवीदास गाणेकर, सल्लागार प्रसाद घाणेकर, चंद्रकांत घाणेकर, सचिन घाणेकर, चंदन गाणेकर, जयेश घाणेकर, तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









