Home latest News हातावर मेहंदी लावली म्हणून शाळेने* *विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारला*

हातावर मेहंदी लावली म्हणून शाळेने* *विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारला*

54

*हातावर मेहंदी लावली म्हणून शाळेने*
*विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारला*

*अरुणकुमार करंदीकर*
*पनवेल शहर प्रतिनिधी*
*मो. क्र. 7715918136*

पनवेल: चेंबुरच्या सुभाषनगर विभागातील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थीनींनी हातावर मेहंदी लावली म्हणून शाळेतील शिक्षकांनी मुलींना शाळेत प्रवेश नाकारल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी व पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी मुलींनी सणानिमित्ताने हातावर मेहंदी लावली होती. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी मुली शाळेत गेल्या तेव्हा शिक्षकांनी हातावरची मेहंदी पुसल्या शिवाय वर्गात प्रवेश देणार नसल्याचे विद्यार्थी मुलींना सांगितले. यादरम्यान, 15 ते 20 मुलींना वर्गात बसु न दिल्यामुळे सर्व विद्यार्थी मुलींना अपमान सहन झाला नाही. त्यामुळे त्यांना मानसिक ताण आला म्हणून सर्व मुली रडत रडतच शाळेतुन बाहेर पडल्या .

मात्र शाळेने विद्यार्थी मुलींवर अशा प्रकारे कारवाई केल्याने संतापलेल्या पालकांनी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे शाळेविरुध्द तक्रार दाखल केली . सदरील तक्रारीची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने शाळेला पत्र पाठवून ह्यासंबंधी तात्काळ लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. मात्र शाळेचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शालेय शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेला भेट देऊन सदर प्रकरणी सविस्तर चौकशी करून शालेय व्यवस्थापनाला नोटीस बजावली तर शाळेच्या मुख्याध्यापिकेने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

शाळेने विद्यार्थी मुलींसोबत भेदभाव केला असल्याचे सांगून काही सामाजिक संघटनांनी व काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर जोरदार विरोध करत तीव्र आंदोलन केले. कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीला त्यांच्या सांस्कृतिक ओळखी वरुन शाळेत येण्यास मनाई करता येऊ शकत नाही. मेहंदी लावल्यामुळे विद्यार्थीनींना वर्गात बसु न देणे नियमबाह्य आहे. राज्य घटनेने सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सर्व मुलींना शाळेतील वर्गात बसु द्यावे. असे काही कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यान मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे. यामुळे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे विद्यार्थी मुलींना शालेय व्यवस्थापनाने पुन्हा वर्गात बसण्याची तात्काळ परवानगी दिली.