Home latest News वरसोली विठ्ठल यात्रा आजपासून सुरु.

वरसोली विठ्ठल यात्रा आजपासून सुरु.

107

वरसोली विठ्ठल यात्रा आजपासून सुरु.

भागवत जाधव,
८८०५०२२५६५

अलिबाग:- वरसोली:कार्तिक एकादशी (उत्पत्ती एकादशी) निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रेला आज पासून सुरू झाली आहे ही यात्रा १५/११/२५ ते २०/११/१५ सहा दिवस असेल.आज पहाटे २:३० वाजता काकडा आरती झाली,३:०० वाजता महाअभिषेक आरती झाल्या नंतर ४:३० वाजल्यापासून देवदर्शनाला सुरवात होईल.

यावर्षी पाऊस उशिरा पर्यंत राहिल्या मूळे जमीन भुसभुशीत असल्याने सुरक्षेते साठी मोठ्या पाळण्यांना परवानगी देण्यात आली नाही.लहान मुलांसाठी पाळणे इत्यादी मनोरंजनासाठी लावली जातील.

यात्रे साठी विठोबा देवस्थाना मार्फत यात्रेकरूच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोबतच पोलीस यंत्रणा यासाठी राबत आहे.

यंदाची यात्रा सहा दिवस असल्यामुळे यात्रेकरूंना आपल्या सोयीप्रमाणे येथे येऊन देवदर्शन व यात्रेची मजा लुटता येईल कार्यक्रमाची रूपरेषा विठोबा देवस्थाने मंदिराजवळ लावली आहे.

पार्किंगची व्यवस्था आपल्या स्वतःच्या जिम्मेदारी वर करावी लागणार आहे यात्रेच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी खाजगी पेड पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे