Come on. Inauguration of State Level Football Tournament at Hinganghat under the auspices of Sameer Kunawar
Come on. Inauguration of State Level Football Tournament at Hinganghat under the auspices of Sameer Kunawar

आ. समीर कुणावार यांच्या शुभ हस्ते हिंगणघाट येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

Come on. Inauguration of State Level Football Tournament at Hinganghat under the auspices of Sameer Kunawar
Come on. Inauguration of State Level Football Tournament at Hinganghat under the auspices of Sameer Kunawar

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी 21 फेब्रुवारी

हिंगणघाट:- 19 फेब्रुवारी ला आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते बी. सी. सी. ग्राउंड हिंगणघाट येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बर्थ फ्युचर स्पोर्ट्स आणि सोशल मल्टीपर्पज सोसायटी हिंगणघाट यांच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन हे अभिनंदनीय व प्रशंसनीय बाब आहे या भारतीय खेळा मधण देशाचे नाव लौकीक करण्याकरिता स्थानिक स्तरातून अशा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार होत असतात.

अशा प्रकारच्या खेळा मधून खेळाडूंमध्ये संघभावना तर निर्माण होतेच परंतु दैनंदिन खेळ खेळल्यामुळे एक आरोग्य वाढवून आरोग्य संपन्न पिढी भविष्यामध्ये तयार होण्यास अशा प्रकारच्या क्रीडास्पर्धा हात भार लावत असतात. अशा प्रकारचे मनोगत समीरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले.

Come on. Inauguration of State Level Football Tournament at Hinganghat under the auspices of Sameer Kunawar

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार समीरभाऊ कुणावार, प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट शहराचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेम बाबु बसंतानी, प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक वासुदेवरावजी तीमांडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव माननीय अंकुश भाऊ ठाकूर, स्टार प्रचारक राकेश भाऊ शर्मा, बालू भाऊ वानखेडे, गजु भाऊ कुबडे इत्यादी मान्यवर व असंख्य गावकरी मंडळी तसेच राज्यातील खेळाडू व क्रीडापटू सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here