Home latest News न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती...

न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजती.

108

*न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजती.

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा: दि. १५ नोव्हें रोजी न्यु इग्लिश स्कूल म्हसळा ‘जन जातीय गौरव दिन’ म्हणुन क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली .याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पाटील डी आर यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती करून दिली. तसेच विद्यार्थी मनोगतात दिया ओसवाल, त्रिशाला चव्हाण,लावण्या साळुंखे,वैभव कामडी,मनस्वी म्हशिलकर,दैविक पवार,हर्ष ओसवाल,दूर्वा घोलप,अंश मोहिते,पायल प्रजापती,पल्लवी गांगुर्डे,सृष्टी खैरनार,आदी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर व कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक मनोगतात वसावे एस.ए यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख करून आदिवासी समाजासाठी त्यांचे योगदान काय होते हे पटवून दिले. दिनांक १नोव्हेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘जनजातीय गौरव पंधरवडा’ साजरा करण्याचे नियोजन करून या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये वारली चित्रकला, निबंध स्पर्धा,आदिवासी नृत्य स्पर्धा,आदिवासीवाडी गावातील पालक भेट असे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच इयत्ता ६ वीतील कु.शांभवी दिवेकर,काव्या म्हशीलकर,मंजिरी पाटुकले,रिया गोविलकर,अक्षरा परबळकर,आर्या जंगम व इ ५ वी तील स्वरा मोरे,विधी तडवी,प्रतिक्षा राठोड,अनुष्का जाधव, सृष्टी राजपूत,रामेश्वरी पारधी,चैतन्या पवार,सृष्टी गायकवाड,तन्वी बांगर या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामडी व्ही.के यांनी केले व आभार सौ शिर्के एस.ए.यांनी मानले यावेळी उपस्थित ज्येष्ठ शिक्षक ई.सी पाटील,गर्जे एन.एम,मोरे.एच बी, सौ पाटील आर डी,सहारे एल पी,गांगुर्डे आर डी, आमले डी सी, खोकले एम.सी, गवळी एन एस, तडवी आय बी आदि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.