Twenty-year-old girl gang-raped by BJP leaders.
Twenty-year-old girl gang-raped by BJP leaders.

भाजपा नेत्यांकडुन वीस वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार.

प्रतिनिधी 22 फेब्रुवारी मध्यप्रदेश:-आज मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार दिसून येत आहे. आता एका राजकिय पक्षाचा नेत्यांनी मिळुन सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे राज्यात सर्वीकडे खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर भाजप नेत्यांसह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. शहडोल जिल्ह्याच याप्रकरणी विजय त्रिपाठीचं नाम समोर आलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं, की तरुणीचं अपहरण करुन तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारु पाजली आणि 18 तसंच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला.

वैश्य यांनी सांगितलं, की या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून गेले. यानंतर पीडितेनं रविवारी 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here