सासरच्या छळाला कंटाळून विवाविहतेची आत्महत्या; विहिरीत आढळला मृतदेह.

49

सासरच्या छळाला कंटाळून विवाविहतेची आत्महत्या; विहिरीत आढळला मृतदेह.

Marital suicide due to harassment by father-in-law; Bodies found in the well.
Marital suicide due to harassment by father-in-law; Bodies found in the well.

हिंगोली :- सासरच्या छळला कंटाळून एका विवाहितेने औढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 20 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांवर हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औढा नागनाथ तालुक्याती वडद येथील 23 वर्षिय महिला मीनाक्षी सोपान चोपडे ही 13फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. 20 फेब्रुवारी रोजी वडद शिवारातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याविषयीची माहिती स्थानिक पोलिसाना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी शिवाजी मारोतराव बेंडे (रा. पळशी) यांच्या फिर्यादीवरून मीनाक्षीची सासू ताईबाई चोपडे, सिंधू, राधा आणि नवरा सोपान चोपडे या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगनमत करून मीनाक्षीला गावातील लोकांच्या शेतात कामला पाठवले, घरात निट काम करत नाहीत या कारणावरून मानसिक आणि शारिरीक त्रास देत उपाशीपोटी तिचा छळ केला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या मीनाक्षीच्या सासरच्या चार जणांविरोधात हट्टा पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.