दोन दिवसात तीन महिलावर बलात्काराच्या घटनेने जळगाव हादरलं.
जळगाव :- रावेर येथील अत्याचाराती घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल तीन महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. भुसावळ येथे आज 35 वर्षीय महिलेवर तर मुक्ताईनगर तालुक्यात काल 22 फेब्रुवारी एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
तर तिसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील वायला ते चिंचखेडा मार्गावर रस्त्याच्या बाजूला तीन ते चार वर्षाच्या चिमुकलीचे पाय बांधल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. संबंधित बालिका कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांची कारवाई काय?
पोलिसांनी मुक्ताईनगर घटनेतील आरोपी चेतन रवींद्र सुतार यास अटक केली आहे. त्याचबरोबर पीडित मुलीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर भुसावळ घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. विशेषता दोन्ही घटनेतील महिला आणि मुलगी मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर रावेरच्या घटनेतील कुटुंबही मध्य प्रदेशातील होतं.