Home latest News बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे स्वः इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे स्वः इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

82

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे स्वः इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 21 नोव्हेंबर
सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे माजी पंतप्रधान स्वः इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय महिला मंडळाचे सचिव भरत बजाज तर प्राचार्य डॉ. मनोज बसेशंकर, सेवानिवृत सिव्हील इंगीनियारिंग विभागाचे विभाग प्रमुख. ए. एम. गुंडावार, सर्वोदय महिला मंडळाच्या सदस्य अनुराधा ढोक संस्थेचे उपप्राचार्य डि. के. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत बजाज व मान्यवरांच्या हस्ते स्वः इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. नंतर उपस्थित मान्यवरांनी स्वः इंदिरा गांधी यांचा राष्ट्राच्या उन्त्तीतील बहुमूल्य योगदानाचे स्मरण करून दिले. जयंतीनिमित्य आयोजीत पुष्पांजली या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.