Home latest News संयुक्त भारत खेल फौंडेशनच्या स्पर्धेमध्ये पनवेल मधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण...

संयुक्त भारत खेल फौंडेशनच्या स्पर्धेमध्ये पनवेल मधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण व विभा चव्हाण यांचे दैदिप्यमान यश

133

संयुक्त भारत खेल फौंडेशनच्या स्पर्धेमध्ये पनवेल मधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण व विभा चव्हाण यांचे दैदिप्यमान यश

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल : संयुक्त भारत खेल फौंडेशन यांनी थिंपू ( भूतान) येथे १२ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भारत, भूतान, थायलंड, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका,, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, आणि फिलीपाईन्स या देशातील सुमारे ७६५ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत पनवेल येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण व त्यांच्या पत्नी विभा चव्हाण यांनी दैदिप्यमान सुयश मिळवले आहे.
विनोद चव्हाण हे नवी मुंबई निवृत पोलिस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विभा विनोद चव्हाण पोलिस उप अधिक्षक, रायगड निवृत्त सेवा अधिकारी असून त्याही नवी मुंबई , निवृत संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. या पती पत्नीनी भारतीय संघातून सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिताराम न्यायनिर्गुणे निवृत पोलिस उपायुक्त, महाराष्ट्र,निवृत पोलिस संघटनेचे सह अध्यक्ष आहेत. यांनी सहभाग घेतला होता त्यांनीही सुवर्ण पदक पटकावले आहे (लाँग टेनिस ). सदर स्पर्धेत विनोद चव्हाण यांनी गोळा फेक,थाळी फेक,आणि हातोडा फेक या तीनही स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. तर विभा विनोद चव्हाण यांनी थाळी फेक व गोळा फेक या दोनही खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे एक्काच घरात पती पत्नी यांनी भारताला पाच सुवर्ण पदके जिंकून दिली आहेत त्याबद्दल निवृती नंतर ही त्यांनी देशासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच नवी मुंबई तील श्री सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ७०+ वयोगटात भारतीय संघात सहभाग घेतला होता. तसेच रायगड जिल्ह्यातील रसायनी मधील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा मधील घनश्याम माशेलकर यांनी ५५+ वयोगटात भारतीय संघात सहभाग घेतला होता. वरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तम माने यांनी लांब उडी थाळी फेक, व हातोडा फेक स्पर्धेत सहभागी होवून तीन सुवर्णपदके जिंकली. तर घनश्याम माशेलकर यांनी १००मी.धावणे, लांब उडी, आणि तिहेरी उडी या तीन स्पर्धेत सहभागी होवून तीन सुवर्णपदके जिंकली या सुवर्णमय कामगिरीबद्दल दोघांचेही सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.