Home latest News श्री राम नामाच्या गजरात प्रभू श्री राम मंदिरावर फडकविण्यात आला धर्म ध्वज..

श्री राम नामाच्या गजरात प्रभू श्री राम मंदिरावर फडकविण्यात आला धर्म ध्वज..

69

श्री राम नामाच्या गजरात प्रभू श्री राम मंदिरावर फडकविण्यात आला धर्म ध्वज..

म्हसळा:संतोष उध्दरकर

म्हसळा:अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिर ध्वजपताका आज सकाळी ठीक ११.५५ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडला. या पाश्वभूमीवर संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात देखील असाच उत्साहपूर्ण कार्यक्रम मंगळवार दिनांक २५/११/२०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.१५ पर्यंत शहरातील श्री राम मंदिर येथे हिंदु ग्रामस्थ मंडळ म्हसळा तर्फे आयोजित करण्यात आला होता. सकाळी ८.०० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत श्री. रामाच्या मूर्तीवर नगरसेवक निकेश कोकचा यांनी सपत्नीक विधिवत अभिषेक केला. तदनंतर धर्म ध्वजाचे पूजन करण्यात आले. अयोध्येत “धर्म ध्वज” फडकविण्याची सकाळी ११.५५ ची वेळ साधत म्हसळा शहरातील श्री राम मंदिरावर देखील “धर्म ध्वज” फडकविण्यात आला. कार्यक्रमची सांगता “महाआरती” ने करणीय आली. सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदु ग्रामस्थ मंडळ म्हसळा चे सचिव सुशील यादव, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, शैलेश पटेल, गौरव पोतदार, पत्रकार संतोष उद्धरकर, दीपल शिर्के,निलेश करडे, विकास धारिया, अनिल बसवत, राजेंद्र बोरकर, निलेश मांदाडकर, तुकाराम पाटील, ललित चीपा, चेतन जैन, रमेश घोसाळकर, संपदा पोतदार, तन्वी करडे, धनश्री फाटक, सुहासिनी आंगोलकर यांच्यासहित अनेक हिंदू ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी कार्यासाठी प्रसन्न निजामपूरकर, संदीप गव्हाणे, कुस्तुभ करडे, संजय पाटुकले, सुधीर करडे, गौरी प्रसाद पोतदार, हर्षला करडे नंदकुमार जंगम यांनी अथक परिश्रम घेतले.