Home latest News श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे भारतीय संविधान दिन साजरा

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे भारतीय संविधान दिन साजरा

39

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे भारतीय संविधान दिन साजरा

पूर्णा : आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता भारताचे संविधान दिवस श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे साजरा करण्यात आला.

भारतीय संविधान स्वीकारण्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी आपल्या देशात संविधान दिन साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली.26 नोव्हेंबरचा दिवस नागरिकांमध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो.संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उमाशंकर मिटकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान देशाला अर्पण करत असताना प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

या वेळी भारतीय संविधानाची उद्देशिका सामूहिक वाचन करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बस्वराज एकलारे महाविद्यालयाची विदयार्थीनी प्राची एकलारे व गणेश सोळंके यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS) द्वारे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. दैवशाला कमठाणे व प्रा.डॉ. राजू शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.