शिवमल्हारीचा येळकोट – येळकोट घे गजर करीत कळंब येथे लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न
कळंब,जि.धाराशिव– प्रति वर्षाप्रमाणे कळंब येथील खंडोबा मंदिर देवस्थानच्या वतीने चंपाषष्टी (सठ) 26 नोव्हेंबर उत्सवाचे आयोजन करण्यात आले , सकाळी खंडोबा मंदिर देवस्थान येथे खंडोबाच्या मूर्तीस अभिषेक पूजा करण्यात आली देवस्थानचे परंपरागत पुजारी म्हणून पांचाळ कुटुंबीयाकडे मान आहे, यानिमित्त पांचाळ यांच्या निवासस्थानापासून खंडोबा चे मुखवटे पालखीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक देवस्थान येथे पोहोचल्यानंतर हे मुखवटे भावीक भक्तांना दर्शनसाठी मंदिरात आणण्यात आले, दिवसभर कळंब पंचक्रोशीतील खंडोबा भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी भक्ता कडून भरीत – रोडगा नैवेद्य अर्पण करण्यात आला तर दुपारी पाच वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला लंगरची सुतारनेट कसबा कळंब येथून गजे ढोल व आसूड नृत्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मंदिर येथे पोहोचली व येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला , लंगर तोडण्याचा मान अविनाश पांचाळ यांना मिळाला लंगर तुटल्यानंतर उपस्थित भक्तांनी बेल ,भंडार व खोबऱ्याची उधळण केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे पुजारी सोपानराव पांचाळ ,दिलीप पांचाळ, उत्तम पांचाळ,सुभाष पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, भारत पांचाळ, अविनाश पांचाळ, विष्णू पांचाळ, योगेश पांचाळ, संकर्षन कोकीळ ,समाधान पांचाळ,शुभम पांचाळ , सौरभ पांचाळ, हितेंद्र राजपूत,अभी नरवडे, यांनी परिश्रम घेतले.









