डॉ. आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वात सर्वसमावेशक संविधान दिले – डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड
केज/ प्रतिनिधी: स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ” भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्ल ” भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्षे तथा भारतीय संविधान दिन ” भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन”,ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान, कथाकथन ” इत्यादी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले.
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून पुजन व वंदन करण्यात आले.
त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन ग्रंथालयाचे आनंद( भैय्या) गायकवाड, जयंत सौदागर यांनी केले. ग्रंथवाचन यशवंत सौदागर, अक्षरा सौदागर, बबन पुंड,आनंद ( भैय्या) गायकवाड यांनी केले.
“भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष ” या विषयावर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य, डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेदकर यांनी जगातील सर्वात सर्वसमावेशक संविधान भारत देशाला देवून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामजिक न्याय दिला.असे प्रतिपादन डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केले. अध्यक्ष स्थानी ह.भ.प. नारायणभाऊ गायकवाड होते. सकाळी ९ ते रात्री ५ पर्यन्त ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.









