Home E-Paper उलवे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत  संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा 

उलवे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत  संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा 

99

पनवेलच्या सह्याद्री संस्थेच्या वतीने संविधानाच्या मोफत प्रतीचे वाटप करण्याचा संकल्प

अरुणकुमार करंदीकर 

पनवेल शहर प्रतिनिधी 

मो.क्र. 7715918136

पनवेल : उलवे मधील कोपरगाव परिसरातील शिवाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवार  २६ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दिप प्रज्वलनाव्दारे शाळेचे मुख्याध्यापक आयु . बाबुराव कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

पनवेल येथील सह्याद्री संस्थेच्या वतीने शासकीय कार्यालय व शाळा आणि महाविद्यालयात संविधानाचे वाचन दरदिवशी केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना संविधानाची, कायद्याची योग्य माहिती मिळेल . याच अनुषंगाने सह्याद्री संस्थेच्या वतीने संविधानाच्या मोफत प्रतीचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. सह्याद्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयु. नंदकुमार कांबळे यांच्या शुभहस्ते शाळेमध्ये संविधानाची प्रत भेट स्वरुपात देण्यात आली.

दिनांक २६ जानेवारी १९४९ रोजी संविधान स्विकारण्यात आले अणि दिनांक २६ जानेवारी १९५० पासुन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. भारतीय संविधानाने समाजवाद , धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची उभारणी करताना न्याय , स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासारख्या अनेक मुलभूत मुल्यांना अधोरेखित केले आहे. यामुळे पुढील पाच वर्षे सर्व शाळांमध्ये मुल्याधिष्टित शिक्षण अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहे. संविधान दिनाचे उपक्रम हे सार्वजनिक ठिकाणी मुल्यवर्धन प्रक्रियेला अधिक बळकटी देतात. ह्या निमित्ताने उलवे येथील जिल्हा परिषदेच्या शिवाजीनगर शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यास अनुसरून विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल उद्बोधक माहिती व त्यांचे महत्व सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मुल्यांचा जागर निर्माण करणे , जबाबदार नागरिकत्वाची जाणिव निर्माण करणे आणि लोकशाही मुल्यांचे आचरण घडविणे यावर विशेष भर देण्यात आला. ह्या प्रसंगी सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे म्हणाले की, संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता मुल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता , सहकार्य, जबाबदारी आणि लोकशाही मुल्यांचे दृढीकरण होते 

सदर कार्यक्रमावेळी संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे, साहेब, कार्याध्यक्ष सुजित मोहिते , उपसचिव रुपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव कांबळे व कोपरगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सानिका पेणकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.