कालिना विधानसभा अध्यक्ष श्रावण यमाजी मोरे यांचे कार्यकर्त्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन
मुंबई : आरपीआय पक्ष आयोजित ‘चलो चेंबूर’ कार्यकर्ता महामेळावा ३० नोव्हेंबर रोजी चेंबूर येथे संपन्न होणार आहे. मुंबई प्रदेशातील या महत्त्वाच्या मेळाव्यासाठी कालिना विधानसभेतील ज्येष्ठ पदाधिकारी, विधानसभा पदाधिकारी, वॉर्ड पदाधिकारी, शाखा पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कालिना विधानसभा अध्यक्ष श्रावण यमाजी मोरे यांनी केले आहे.
मेळावा सायंकाळी चार वाजता सुरू होणार असून, कालिना विधानसभेतील पदाधिकाऱ्यांसाठी प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रिपब्लिकन रिक्षा युनियनतर्फे चेंबूरकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी रिक्षांची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा संघटनात्मक दृश्यातून महत्त्वपूर्ण ठरणार असून, उत्साहपूर्ण सहभागाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









