Home latest News अवैध दारू वाहतूक रॅकेटवर मनोर पोलीसांची मोठी कारवाई

अवैध दारू वाहतूक रॅकेटवर मनोर पोलीसांची मोठी कारवाई

61

२० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

भरत पुंजारा

पालघर तालुका प्रतिनिधी

मो.९९२३८२४४०७

पालघर: पालघर जिल्ह्यात अवैधरित्या चालणाऱ्या दारू वाहतूक व दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेल्या व्यापक मोहिमेला यश मिळाले आहे. मनोर पोलीस ठाणे पथकाने मोठी कारवाई करत एकूण २०,१७,१६८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेस सक्त सूचना केल्या आहेत.

उक्त आदेशानुसार, ०३ डिसेंबर २०२५ रोजी मनोर पोलीस ठाण्याचे पथक मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की टाटा कंपनीचा फिक्कट तांबूस तपकिरी रंगाचा टेम्पो (क्रमांक MH18-BH-7700) दमण येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारू घेऊन महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी नांदगाव ओव्हरब्रिज परिसरात सम्राट हॉटेलजवळ सापळा लावला. दुपारी अंदाजे ३.०० वाजता संशयित टेम्पो आढळताच तो अडवून तपासणी करण्यात आली. वाहन चालकाने आपले नाव —

किशोर भिका बावीसकर (वय ३९), रा. सुर्यानगर झोपडपट्टी, विक्रोळी, मुंबई

(मुळ रा. हिंगोणे, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. वाहनाची पाहाणी केली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली दमण बनावटीची १०,१७,१६८/- रुपये किंमतीची अवैध दारू आढळून आली. वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत २०,१७,१६८/- रुपये इतकी आहे.

अधिक तपासातून उघड झालेले धागे

चौकशीत आरोपीने पुढे सांगितले की ही दारू सिल्वासा येथील व्यक्तींमार्फत भरली गेली असून ती धुळे येथे पोहोचविण्यासाठी सांगण्यात आले होते.

संशयितांचे तपशील

अमित कुमार शुक्ला (पंडीत)

गोरब गोसले (मोनू)

सुरज चौबे (पूर्ण नाव-पत्ता मिळालेला नाही)

+ इतर आरोपी — एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मनोर पोलीस ठाणे गु.र. नं. 324/2025

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद

मुख्य आरोपी किशोर भिका बावीसकर यास अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

कारवाईतील पोलीस अधिकारी

ही यशस्वी कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

श्री. यतिश देशमुख — पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे — अपर पोलीस अधीक्षक, पालघर सौ. प्रभा राऊळ — उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग

कारवाई करणारे पथक —

पोनि रणवीर बयेस

पोउपनि सुभाष गोईलकर पोउपनि संग्राम पाटील पोना ८८३ उदय चौधरी

पोना १२८६ पिंटु फरारा पोअं ९४१ नागेश निळ

(नेमणूक : मनोर पोलीस ठाणे)

पुढील तपास पोउपनि संग्राम पाटील करत आहेत.