Home latest News भिवंडीमध्ये क्राइम ब्रांचची मोठी कारवाई…

भिवंडीमध्ये क्राइम ब्रांचची मोठी कारवाई…

45

साडे सोळा लाख रुपयांचा बंदीस्त गुटखा जप्त

अभिजीत आर. सकपाळ

ठाणे ब्युरो चीफ

9960096076

भिवंडी: भिवंडीमध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी आणि तंबाखूची अवैध विक्री रोखण्यासाठी अपराध शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन ठिकाणांहून मिळून तब्बल 16.51 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईनंतर शहरातील गुटखा माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे, तर शांतीनगर परिसरात मोठी जप्ती पोलिसांच्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजता क्राइम ब्रांचच्या पथकाने शांतीनगर येथील मकसूद भाई बिल्डिंग मधील गाला क्रमांक 1 आणि 4 वर छापा टाकला. येथून विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.तर जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत 8,76,540/- रुपये इतकी आहे.

तर या प्रकरणात पोलिसांनी आबदान मोहम्मद अंसारी याला अटक केली असून त्याच्या पुढील चौकशीमधून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मोहम्मदिया मशिदीजवळ बशीर कॉम्प्लेक्समध्ये गाला क्रमांक 4,येथे छापा टाकला असून येथून गुल मोहम्मद सुफियान अहमद खान याच्याकडून 7,75,285/- रुपये किमतीचा बंदीस्त गुटखा पोलिसांनी जप्त केला. या दोन्ही ठिकाणांतून जप्त केलेल्या मालाची एकत्रित किंमत सुमारे 16,51,825/- रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गुटखा माफियांवर पोलिसांची कडक मोहीम राबून महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित पान मसाला व तंबाखूची विक्री, साठवण आणि वाहतूक पूर्णपणे बंदीस्त आहे. तरीही भिवंडीतील काही भागांत अवैधरित्या गुटख्याची तस्करी आणि वितरण सुरू असल्याचे उघड झाले आहे. क्राइम ब्रांचच्या या धडक कारवाईमुळे या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

जप्त मालाचा स्रोत, पुरवठा साखळी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी काही गुटखा माफिया अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.