घराबाहेर हाकलल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी: एका महिलेला मुलगा झाल्यानंतर वाढलेल्या खर्चाच्या कारणावरून पतीने मारहाण करत घराबाहेर हाकलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. फकरुद्दीन इब्राहिम शेख (36, रा. भिवंडी) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 32 वर्षीय महिलेचा 3 सप्टेंबर 2018 रोजी फकरुद्दीन याच्याशी निकाह झाला होता. सुरुवातीला दाम्पत्याचे संसार सुखाने चालत होते. मात्र पुढे किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वाद वाढू लागले.
5 सप्टेंबर 2025 रोजी पीडितेला पुत्रप्राप्ती झाली. 7 सप्टेंबर रोजी ती बाळासह घरी परतली. यानंतर खर्च वाढल्याचा बहाणा करत आरोपी पती तिला सतत माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता, अशी तक्रार पीडितेने केली आहे.
मारहाण करीत 16 ऑक्टोबरला घराबाहेर हाकलले पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फकरुद्दीनने वाढलेल्या खर्चाचा राग काढत तिला सतत शिवीगाळ करत, मारहाण केली आणि 16 ऑक्टोबर रोजी घराबाहेर हाकलून दिले. यानंतर बाळ आणि पत्नी—दोघांनाही खर्चासाठी पैसे देणे त्याने बंद केले तसेच पुन्हा मारहाणीची धमकी दिली. सदर महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यात थेट धाव घेऊन गुन्हा दाखल करून जाचाला कंटाळून पीडितेने 6 डिसेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीवर भान्यासं कायद्यानुसार कलम 85, 115(2), 352, 351(2), 316(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज मोटे करत असून,संपूर्ण माहितीची पुष्टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी केली.









