कोकणातील पहिले फार्मर कप निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
50 महिला व पुरूष शेतक-यांचा सहभाग
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९२०३२५९९३
अलिबाग:- पाणी फाउंडेशन, रायगड जिल्हा कृषी विभाग, आत्मा विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप 2026 अंतर्गत कोकण विभागातील पहिल्या तीन दिवसीय रहिवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप बुधवारी (ता. 7) माणगावातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या सभागृहात उत्साही वातावरणात झाला. या प्रशिक्षणत शिबिरात एकूण 50 महिला व पुरूष शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
फार्मर कप 2026 ही स्पर्धा पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेती उत्पादन वाढवणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतक-यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यानेही यावर्षी सहभाग घेतला असून स्पर्धा जिंकण्यासाठी शासन व शेतक-यांनी कंबर कसली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची प्रथम निवड करून एकूण 50 महिला व पुरूष शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे शिबिर 5 ते 7 जानेवारीदरम्यान पार पडले. शिबिराच्या माध्यमातून शेतक-यांना गट शेती व स्मार्ट शेती या संकल्पनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप कार्यक्रमास आत्मा विभाग संचालक सुनील बोरकर, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, पाणी फाउंडेशनकडून प्रमुख मार्गदर्शक नामदेव ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे व उमेद जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी शेती क्षेत्रातील बदल स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कायम शिकण्याची भूमिका ठेवणारा, नवीन बदल स्वीकारणारा आणि एकत्र येऊन शेती करणाराच यशस्वी होतो. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीत प्रयोगशीलता ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाणी फाउंडेशन शेतक-यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण करण्याचे कार्य करत असून, अशा प्रशिक्षणातून शेती क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विविध उदाहरणे व बोधकथांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन त्यांनी केले.
फार्मर कप 2026 ही स्पर्धा पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेती उत्पादन वाढवणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतक-यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यानेही यावर्षी सहभाग घेतला असून स्पर्धा जिंकण्यासाठी शासन व शेतक-यांनी कंबर कसली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची प्रथम निवड करून एकूण 50 महिला व पुरूष शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले.