Home latest News नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर स्विकारू – अनिकेत पानसरे 

नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर स्विकारू – अनिकेत पानसरे 

146

नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर स्विकारू – अनिकेत पानसरे 

संतोष उध्दरकर

म्हसळा: म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी गेली अनेक दिवस नाट्यमय घडामोडी बदलत असतांना दिसत आहे, म्हसळा नगर पंचायतीचा नगराध्यक्ष कोण यावर अध्याप सुत्र जुळत नसल्याने संभ्रम अधिक वाढला असुन दि. 21 मे रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून या पुढील नगराध्यक्ष कोण हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे, गेली अनेक दिवस प्रभारी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे अनिकेत पानसरे यांना पुन्हा जबाबदारी दिली तर स्विकारू व अधिक उत्तम पद्धतीने काम करू तसेच नाही दिली तरी होणाऱ्या नगराध्यक्ष यांच्या सोबत अधिक जोमाने करू असे आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना स्पष्ट केले.

पानसरे यांच्या वक्तव्याने वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.येणाऱ्या जुन महिन्यातील पहिल्या आठवड्यात हे स्पष्ट होईल.या सर्व घडमोडीत सामान्य जनतेला वाली कोण…?