Home latest News चंद्रकांत कापरे यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनी ह.भ.प. मंदार जोशी यांचे किर्तन

चंद्रकांत कापरे यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनी ह.भ.प. मंदार जोशी यांचे किर्तन

43

संतोष उध्दरकर

म्हसळा: म्हसळा शहरातील श्री सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे १४ जुन २०२४ रोजी पहाटे अकस्मित निधन झाले होते, कापरे यांच्या निधनाने म्हसळा तालुक्यात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले होते, चंद्रकांत कापरे हे एक हॉटेल व्यवसाईक असले तरी राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करीत होते पण सर्व पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्या बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,दि.८ जुन २०२६ वार सोमवार रोजी चंद्रकांत कापरे यांच्या तिथिप्रमाणे व्दितीय पुण्यस्मरण दिनी म्हसळा येथील राहत्या घरी प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. मंदार जोशी यांच्या किर्तनाचे आयोजन करून भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या वेळी म्हसळा तालुक्यातील अनेक मित्र परिवार यांनी चंद्रकांत कापरे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, ह.भ.प. मंदार जोशी यांनी अतिशय सुस्वर व बोधात्मक किर्तन केले,कापरे यांच्या जवळचे मित्र पत्रकार संतोष उद्धरकर यांनी कापरे यांना शब्दातुन श्रद्धांजली अर्पण करतांना त्यांच्या आठवणीने भावना अनावर होऊन डोळे पाणावले,सुनिल उमरठकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली, तसेच किर्तनकार, चित्रकार व पत्रकार हे त्रिवेळी संघम असुन प्रत्येक जण बोधात्मक काम करतो हे देखील सांगितले. यावेळी कापरे व गव्हाणे परिवार यांनी ह.भ.प. मंदार जोशी यांचे यथोचित सन्मान करून त्यांचे आशिर्वाद घेतले.