कारंजा (घाडगे) चे दोन व्हॉलीबॉल खेडाळू राष्ट्रीय संघात.
✒आशीष अंबादे प्रतीनिधी✒
कारंजा (घा.),11 मार्च:- नुकत्याच पन्हाळा (कोल्हापुर) येथे झालेल्या वयोगट 16 वर्षा आतील मुलींची राष्ट्रीय संघामध्ये मॉडेल स्पोर्टिंग क्लब खेडाळू रक्षा विनोद खेनवार व सोबत बीड येथे 18 वर्षीय आतील राष्ट्रीय संधामध्ये लक्ष्मी संजय घुगुस्कर हिची निवड झालेली आहे. रक्षा विनोद खेनवार हीने वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत 4 नेशनल पटकाविण्याचा गौरव प्राप्त केला आहे. मॉडेल हायस्कूल व मॉडल स्पोर्टिंग क्लब च्या बऱ्याच व्हॉलीबॉल खेडाळूनी आता पर्यंत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
दोघींच्या यशाला मॉडल-हायस्कूलचे संदीपजी काळे, प्राचार्य हेमंतजी ढोले सर, उप-प्राचार्य महादेवजी टोपले सर, स्पोर्ट शिक्षक मनोज काळे सर व चंद्रशेखर गिऱ्हाळे सर तसेच मॉडल स्पोर्टिंग क्लब चे व्हॉलीबॉल प्रशिक्षक- पंकज अग्रवाल, न.प. कारंजा माजी क्रीड़ा व शिक्षण सभापति प्रेमसिंग महीले, माजी ग्रा. प. सदस्य कमलेश कठाणे यानी अभिनंदन केले व पुढ़िल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.