कोरोना काळात अधिवेशन चालते तर मग MPSC च्या परीक्षा का नाही? आमदार किशोर भाऊ जोरगेवार

मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की विध्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करून MPSC परीक्षांची तयारी करतात अशात शासनातर्फे अशा प्रकारचा निर्णय घेणे हे निराशाजनक आहे. आज गांधी चौकात अनेक विद्यार्थी आणि यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी आंदोलन स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला न्याय देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना MPSC परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्यासाठी चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here