भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा पूनरास्थापित करा राजुरा येथील नागरींकानि केली धरणे देऊन मागणी.

55

भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा पूनरास्थापित करा राजुरा येथील नागरींकानि केली धरणे देऊन मागणी.

 Restore the full-length statue of Lord Birsa Munda by the citizens of Rajura.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर दि.12 मार्च:- चंद्रपूर येथील महानगर पालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा हटविल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या , त्यामुळे राजुरातिल नागरीकानि या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत राजुरा तहसील कार्यालया समोर महानगर पालिकेच्या निषेधार्थ ऐक तास धरणे देण्यात आले.

तहसीलदार राजुरा यांचे मार्फत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, व त्याच ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा त्वरीत बसवावा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली, अन्यथा राजुरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाज बाधंवानि दिला आहे.

निवेदन देताना श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम जि मेश्राम, अ.भा .आ.वि.परीषदेचे तालुका सचिव दिपक मडावी, संतोष मेश्राम माजि नगर सेवक , दौलत करपते, तुळशीराम किनाके, लक्ष्मीबाई मडावी, पार्वतीबाई कोटनाके यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार यानी निवेदन स्वीकारले