कळमेश्वर पोलिसांची धडक कारवाई निमजी खदान येथे 12 लाखाचा दारूसाठा जप्त.

59

कळमेश्वर पोलिसांची धडक कारवाई निमजी खदान येथे 12 लाखाचा दारूसाठा जप्त.

 Kalmeshwar police seize liquor worth Rs 12 lakh at Nimji mine.
 जप्त केलेला मुद्देमाला सह कामगिरी बजावणारे कळमेश्वर पोलीस पथक

प्रतिनिधी युवराज मेश्राम

कळमेश्वर:- पासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निमजी खदान येथील बरडावर गोपनीय सूत्रानुसार प्राप्ती माहितीच्या आधारे पोलिसांनी कळमेश्वर हद्दीतील निमजी बरड येथे सुरु असलेल्या मोहा फुल दारू भट्टी वर धाड टाकून तब्बल बारा लाख 45 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट व भट्ट्या उद्ध्वस्त केल्या ही कारवाई सोमवारी रात्री सात वाजता च्या सुमारास करण्यात आली याप्रकरणी दहा आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावरून पाच हजार आठशे लिटर कच्चामाल रसायन सडवा एकशे पंधरा लिटर गावठी दारू ड्रम घमेले इतर साहित्य जप्त करण्यात आले ही धडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर सावनेर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक स र भडक कळमेश्वर चे ठाणेदार आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे डसे मेश्राम साहाय्यक फौजदार दिलीप सपाटे गणेश मुदळ माळी पोलीस कॉन्स्टेबल उईके व इतर कर्मचार्‍यांनी केले.