बल्लारपुर शहरात 2 युवकांनी केली आत्महत्या एका नि हरपिक पिले व दुसऱ्यांनी गळफहास घेऊन आत्महत्या.
सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर :- सविस्तर वृत्त असे आहे की बल्लारपुर शहरात विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्याचे सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे नुकतीच बल्लारपूर शहरात किल्ला वॉर्ड बल्लारपूर येथे भगतसिंग रामसिंग बैस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अवघ्या 2 दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय निरागस मुलीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला ती शाई वाळते न वाळते तोच आज बल्लारपूर शहरातील दोन विविध वॉर्डात 2 तरुणांनी आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास बालाजी वॉर्ड निवासी असलेले स्व नरसय्या येनगन्धलावार (नगरसेवक) यांच्या आजारपणामुळे झालेल्या मृत्यूमुळे वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजू नरसया येनगन्धलावार वय – 28 वर्ष यांनी घराच्या बाथरूम मध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे तर दुसऱ्या घटनेत रवींद्र वॉर्ड बल्लारपूर येथील शुभम राजू बहुरीया वय – 26 वर्ष आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला जायचे कारण सांगून गेला असता खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला असल्याची माहिती आज सकाळी 8 :00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली या दोन्ही घटनांचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे मात्र अलीकडील काही दिवसात तरुण मुलांच्या आत्महत्या मुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे