Home latest News चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 72 कोरोनामुक्त 123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 72 कोरोनामुक्त 123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

72

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 72 कोरोनामुक्त 123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

आतापर्यंत 24,138 जणांची कोरोनावर मात, ॲक्टीव पॉझिटिव्ह 1305

 72 corona free 123 positives in last 24 hours in Chandrapur district; Three deaths

सौ हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 22 मार्च :- जिल्ह्यात मागील 24 तासात 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 856 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 138 झाली आहे. सध्या 1305 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 52 हजार 46 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 21 हजार 171 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील 75 वर्षीय पुरूष, सरकार नगर, चंद्रपूर, येथील 78 वर्षीय पुरूष व कुकुडसा ता. कोरपना येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 123 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 34, चंद्रपूर तालुका पाच, बल्लारपूर 18, भद्रावती 24, ब्रम्हपुरी 15, मूल दोन, सावली सात, चिमूर 10, वरोरा पाच, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.