आजीचा मदतीच्या बाहाण्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 18 दिवस बलात्कार.

53

आजीचा मदतीच्या बाहाण्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 18 दिवस बलात्कार.

 Grandmother raped a 15-year-old girl for 18 days under the pretext of helping her.

✒युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर, दि.23 मार्च:- आज महिला अत्याचाराचे प्रमाण खुप वाढले असल्याचे अनेक घटना वरुन दिसुन येत आहे. नागपूरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या सक्करदऱ्यात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचे एका आरोपीने अपहरण केलं आणि तिला एका खेडेगावात नेऊन घरात डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर सलग 18 दिवस बलात्कार करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी गांभीर्य ओळखून आरोपीला बेड्या ठोकल्या आणि पीडित मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी ही आजीसोबत सक्करदरा परिसरात राहते. तिची ओळख सूर्या जांभूळकर वय 19, वर्ष रा. आजरी – माजरी याच्यासोबत झाली. तो तिच्या आजीला नेहमी मदत करत होता. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे होते. सूर्याची नजर रियावर होती. गेल्या 18 दिवसांपूर्वी रियाची आजी आजारी होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सूर्याला ही संधी सापडली. तो तिच्या घरी गेला. आजीला बघायला हॉस्पिटलमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने घाईघाईत तयारी केली. त्याच्या दुचाकीवर बसली. त्याने थेट दुचाकी आजरी माजरी परिसराकडे नेली.

रियाने विचारणा केली असता त्याने आजीच्या उपचारासाठी पैसे आणायचे असल्याचे कारण सांगितले. त्याने कळमनाजवळ असलेल्या एका खेड्यात नेले. तेथे एका घरात कोंडून ठेवले. तिच्यावर रात्रीच्या सुमारास बलात्कार केला. तिला तो घरात कोंडून ठेवत होता. गेल्या 18 दिवसांपासून तो तिच्यावर बलात्कार करीत होता.

एक दिवस पीडित मुलीला संधी मिळाली. दुपारी सूर्या बाहेर गेला असता तिने त्याच्याच मोबाईलवरून आजीला फोन केला. तिने आजीला घडलेली सर्व हकिगत सांगितली. वृद्ध आजीने पोलिसांना माहिती दिली. मात्र, सक्करदरा पोलीस कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त होते. घटनेचे गांभीर्य ओळखता यशोधरानगरचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी पथकाला सूर्याला शोधासाठी पाठवले.

आरोपी बिनाकी मंगळवारीजवळील पुलाखाली उभा असल्याची माहिती मेश्राम यांना मिळाली. त्यांनी लगेच पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतले आणि सक्करदरा पोलिसांना कळविले. या प्रकरणात सूर्याला कोणी इतर दुसऱ्या लोकांनी काही मदत केली का याचा तपास पोलीस करत आहे.