Home latest News आरेच्या जंगलात पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमीचे आंदोलन

आरेच्या जंगलात पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमीचे आंदोलन

82

आरेच्या जंगलात पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमीचे आंदोलन

आरेच्या जंगलात पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमीचे आंदोलन

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. 8149734385

जोगेश्वरी :- दि. 03/07/2022 रोजी पुन्हा एकदा आरेच्या जंगलात पर्यावरण प्रेमीचा आवाज मेट्रो-3 चे कारशेड या विरोधात दुमदूमला. मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्येच होणार, असा पवित्रा नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने घेतला. त्यामुळे या सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पर्यावरणप्रेमीनी रविवारी आरे मध्ये आंदोलन केले.
आरेचे जंगल हे वन्य जीवांचे घर आहे. मुंबईकरांसाठी आरेचे जंगल हे निसर्गाची एक चांगली देण आहे. या जंगलात विविध प्रकारचे पशुपक्षी, विविध प्रकारची झाडे वास्तव्यास आहेत. आरेच्या जंगलाला मंबईचा श्वास मानला जातो. मुंबईत राहून गावचे सुख हे आरेच्या जंगलात मिळते. असा हा मुंबईकरांचा श्वास असणाऱ्या आरेला आता नवीनच सत्तेवर आलेल्या सरकारने तेथे होणारा मेट्रो-3 चा कारशेड कांजूरमार्गकडे किंवा इतर ठिकाणी वळवावा, अशी विनंती उपस्थित पर्यावरणप्रेमीनी शासनाकडे केली. नव्या सरकारकडे मेट्रोचे कारशेड करण्यासाठी कांजूरमार्ग हा पर्याय उपलब्ध असतानाही आरेमध्ये करण्याचा निर्णय घेतला गेला, यावर तेथील आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आरेच्या बचावासाठी जमलेल्या पर्यवरणप्रेमीनी शासनाच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. निसर्गबद्दलची विविध प्रकारची संदेश पत्रके घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. Save आरे Save मुंबई, Save आरे! Save Next Genration! अशाप्रकारची विविध पत्रके तयार करून निसर्गबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्यात आले. आरेच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात निसर्गप्रेमिनी हे आंदोलन पार पाडले.