Home latest News उमेश कोल्हे यांची हत्या, आणि इस्लामी धर्मांधता, कधी थांबणार हे सर्व?

उमेश कोल्हे यांची हत्या, आणि इस्लामी धर्मांधता, कधी थांबणार हे सर्व?

68

उमेश कोल्हे यांची हत्या, आणि इस्लामी धर्मांधता, कधी थांबणार हे सर्व?

उमेश कोल्हे यांची हत्या, आणि इस्लामी धर्मांधता, कधी थांबणार हे सर्व?
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,

२१ जूनला अमरावतीला फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांचा गळा चिरून त्यांचा खून करण्यात आला. खून करणारे कोण होते माहित आहे? २२, २३, २४ वर्षे वयाचे चार मुसलमान तरुण. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येचं कारस्थान रचण्यात आलं. भररस्त्यात कोल्हे यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.

उमेश कोल्हेंनी आपल्या मेडिकल व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पोस्ट शेर केले होते. स्वतः लिहिलेले नव्हे. तरी त्यांच्या खूनाचा कट केला गेला, आणि त्यांचा विश्वासघात करणारा नराधम कोण होता माहित आहे? १६ वर्षांपासून त्यांचा मित्र असलेला
डॉ. युसूफ खान बहादूर खान! उमेश कोल्हे यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून युसूफ खानाने आपल्या मुस्लिम सदस्य असलेल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवले आणि त्यांना धडा शिकवायचा आग्रह केला. उमेश कोल्हेचा पत्ता, ते किती वाजता येतात, जातात, त्यांची घरगुती माहिती, सर्व युसूफ खानाने मुस्लिम माथेफिरूंना दिली. १६ वर्षांची मैत्री, उमेश कोल्हेनी वेळोवेळी केलेली पैशाची मदत, सर्व विसरून युसूफ खानाने त्यांच्या खुनाचा कट रचला. युसूफ खान इतका निर्लज्ज आणि उलट्या काळजाचा इसम निघाला की उमेश कोल्हेंचा गळा चिरून खून झाल्यानंतर यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात युसुफ खान साळसूदपणे सहभागी झाला होता!

21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकल स्टोर मधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. चार मुसलमान युवकांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले, आणि त्यांना तसेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून ते पळून गेले. पोलिसांनी नंतर हल्लेखोरांना पकडले खरे, पण तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सेकुलर सरकार होते महाराष्ट्रात, त्यामुळे नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे उमेश कोल्हे यांचा गळा चिरला गेला ही बातमी जाणून बुजून दडवण्यात आली आणि चोरीच्या निमित्ताने ही हत्या झाली असे भासवण्याचा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला.

पुढे चार दिवसांनी उदयपूर मध्ये शिंपी कन्हैया लाल ची अशीच गळा चिरून मुसलमान लोकांनी निर्घृण हत्या केली. तोपर्यंत ठाकरे सरकार पडलेले होते. तेव्हा कुठे पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या हा मुसलमानी हेट क्राईम आहे हे सत्य सांगण्याचे धैर्य दाखवले. आता ही केस NIA कडे आहे, पण उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर अस्सल मराठी माणूस असलेल्या उमेश कोल्हे यांना न्याय कधीच मिळाला नसता ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अमरावतीत देशविघातक कारवाया अश्याच चालू राहिल्या असत्या.