पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त – मुख्यमंत्री

🖋अश्विन गोडबोले
📞8830857351
मुंबई : – विधानसभा विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर आमदारांच्या अभिनंदनपर
भाषणांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. भाषणादरम्यान त्यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यात इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्यावर पंतप्रधानांनी केंद्रीय कर कमी केला होता. पंतप्रधानांनी विनंती केली होती की सर्व राज्यांनी व्हॅट कमी करावा. त्यानुसार इतर राज्यांनी देखील व्हॅट कमी केला होता. परंतु महाराष्ट्राने पाच पैसे देखील कमी केले नव्हते. तर आता आमचं युतीचं सरकार हा व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या बळीराजाच्या बांधावर सगळेच लोक जाऊन, त्याची विचारपूस करतात. बळीराजाच्या जीवनात देखील सुखाचे क्षण यावेत म्हणून राज्य सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचं सगळ्यांचं योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून सोबत काम करूया. असे मुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.








