धारूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताह उत्साहात संपन्न!
धनंजय कुलकर्णी
किल्लेधारूर( वा):अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली प्रधान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या आशीर्वादाने व आदेशानुसार किल्ले धारूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त नाम जप सप्ताह व सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सप्ताह काळात विविध धार्मिक ग्रंथ श्री स्वामी चरित्र श्री दुर्गा सप्तशती श्री मल्हारी सप्तशती श्री नवनाथ पारायण श्री भागवत पारायण श्री रुद्र पठण यांचे पारायण सेवा करण्यात आल्या तसेच एक दिवसीय मूल्य संस्कार शिबिर चे आयोजन देखील करण्यात आले होते त्यात विविध स्पर्धा चे आयोजन करून विजेत्यांना तसेच सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच येणाऱ्या 5 जानेवारी 2026 रोजी उज्जैन मध्यप्रदेश येथे श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधिश प पू गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत श्री भस्म लिंगारचन सोहळ्याचे आयोजन असून जास्तीत जास्त भाविकांनी केंद्राच्या माध्यमातून या सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले. या वेळी भावीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते









