Home latest News परभणी वसमत रोडवर क्रेटा-डिझायरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर तर तिघांचा जागीच मृत्यू

परभणी वसमत रोडवर क्रेटा-डिझायरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर तर तिघांचा जागीच मृत्यू

109

परभणी वसमत रोडवर क्रेटा-डिझायरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर तर तिघांचा जागीच मृत्यू

सदाशिव राऊत 

परभणी: पासून जवळच असलेल्या राहटी परिसरातील विश्वशांती ज्ञान पिठालगत आज दि.06 शनिवार रोजी पहाटेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर, आणि क्रेटा या गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परभणीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणी तालुक्यातील ताडकळस पोलीस स्टेशन मध्ये सखाराम साखरे यांनी दिलेल्या माहिती आधारे त्यांचे चुलत भाऊ बाबाराव दत्तराव साखरे ,रा. आरळ तालुका वसमत हे स्विफ्ट डिझायर क्रमांक . एम एच 38 ए डी 35 41 या वाहनाने आरळवरून परभणी कडे येत असताना समोरुन येणाऱ्या क्रेटा या कंपनीच्या mh22 बीसी 78 88 या क्रमांकाच्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक बसली. त्यात ,बाबाराव साखरे (राहणार आरळ) विमलबाई बालासाहेब जाधव (रा, पिंगळी तालुका परभणी) आणि कांताबाई अंबादास कातोरे (रा, आरळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर साईनाथ रामचंद्र काकडे (रा आरळ) आणि हरी बालासाहेब जाधव (रा, पिंगळी) हे दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

या सर्व घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, रणखांब, व रावेर आणि चोरघडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी सखाराम साखरे यांच्या तक्रारीवरून क्रेटा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे कलम-106 (1) 281, 125, (अ) आणि 125 )( ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक. गजानन मोरे हे करीत आहेत