Home latest News सचिन डाकी आणि मंगला सचिन डाकी या पती-पत्नीचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान
सचिन डाकी आणि मंगला सचिन डाकी या पती-पत्नीचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मराठी भाषा संवर्धन, प्रचार आणि प्रसार तसेच साहित्य चळवळीत अग्रगण्य अश्या साहित्यसंपदा संस्थेचा वर्धापनदिन रविवार दि. ९ नोहेंबर रोजी डोंबिवली विनायक मंदिर सभागृहात पार पडला. ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक चळवळ राबविते आणि सदर क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्तिंना संबंधित क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करीत असते.
हाशिवरे गावचे सुपुत्र सचिन डाकी हे तळोजा येथे टेक्नोवा कंपनीत कार्यरत असून पनवेल येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नी सौ. मंगला डाकी या पनवेल कामोठे येथील एमजीएम ईस्पीतळात गेली वीस वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. याच कारणामुळे सचिन डाकी यांचा एमजीएम ईस्पीतळ कामोठे पनवेल तेथील डाॅक्टरांशी संपर्कात असतात. आज कित्येक वर्षे सचिन डाकी आणि मंगला डाकी हे पतीपत्नी समाजातील गरीब, निरक्षर तसेच परीसरातील आदीवासी समाजातील पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांना मानसिक आधार देतात, त्यांना काही सरकारी, निमसरकारी योजनांच्या अनुशंगाने कागदपत्रांची जमवाजमव करून आणि पेशंटसंदर्भात डाॅक्टरांबरोबर संवाद साधून जास्तीत जास्त योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच ॠग्ण पूर्णपणे आजारमुक्त होऊन त्याला ईस्पीतळातून डिस्चार्ज मिळेपर्यंतचे जनसेवेचे कार्य हे उभयता अगदी निष्ठेने करतात. आजपर्यंत शेकडो रुग्णांना त्यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. म्हणून याच त्यांच्या सेवेकरीता साहित्यसंपदा संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन उभयतांना “समाज रत्न” हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकनाथ अव्हाड तसेच प्रमुख अतिथी म्हणून गझलकार तसेच गीतरामायणाचे हिंदी अधुवादकर्ते दत्तप्रसाद जोग, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविणारे आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते आदी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार दिल्याने पुरस्कार्त्याला त्याचे कार्य करण्यासाठी स्फुर्ती मिळते आणि ती व्यक्ती त्याचे कार्य पुढे जोमाने सुरू ठेवते असे मत साहित्यसंपदा संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे यांनी व्यक्त केले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सचिन डाकी आणि मंगला डाकी यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.