Home latest News पुरुष व महिला क्रिकेट मधील तुम्हाला हा फरक माहित आहे का?

पुरुष व महिला क्रिकेट मधील तुम्हाला हा फरक माहित आहे का?

79

पुरुष व महिला क्रिकेट मधील तुम्हाला हा फरक माहित आहे का?

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग: मित्रांनो आपण हल्लीच महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला याचा आपल्याला रास्त अभिमान आहेच पण आपल्याला माहित आहे का पुरुष आणि महिला क्रिकेट सामन्यांमध्ये बरेच नियम वेगवेगळे आहेत ते आपण जाणून घेऊयात.
१) क्रिकेट बॉल चे वजन: महिला क्रिकेट संघाचे चेंडू हलके वजनाने साधारण, साधारणपणे १४० ग्रॅम ते १५१ ग्रॅम असते तर पुरुष संघाचे चेंडू जड असतात साधारणपणे १५६ ग्रॅम ते १६३ ग्रॅम असते.
२) क्रिकेट चेंडूचा घेर: महिला क्रिकेट संघाचा चेंडूचा घेर २१ सेंटीमीटर ते २२.५ सेंटीमीटर असतो तर पुरुष संघाचा चेंडूचा घेर २२.४ सेमी ते २२.९ सेमी असतो.
३) महिला क्रिकेट संघासाठी सीमारेषेची लांबी कमी असते साधारणपणे खेळपट्टीच्या मध्यभागापासून ५५ ते ७० यार्ड अंदाजे ५० ते ६४ मीटर असते तर पुरुष संघाची सीमारेषा जास्त असते खेळपट्टीच्या मध्यभागापासून ६५ ते ९० यार्ड अंदाजे ५९ ते ८२ मीटर असते.
४)टेस्ट मॅच चा कालावधी: महिला क्रिकेट संघासाठी चार दिवसांचा असतो तर पुरुष संघासाठी पाच दिवसांचा असतो. महिलांसाठी किमान शंभर षटके प्रतिदिन प्रती तास सतरा षटके बंधनकारक असते. तर पुरुष संघास एका दिवसात ९० षटके प्रती तास १५ षटके टाकने बंधनकारक असते.
५) फॉलो ऑन नियम टेस्ट मॅच साठी महिलांसाठी फॉल ऑन देण्यासाठी १५० धावांची आघाडी पुरेशी असते तर पुरुषासाठी २०० धावांची आघाडी लागते.
६) पॉवर प्ले नियम वन डे मॅच साठी: महिलांसाठी एकच पॉवर प्ले असतो पहिली १० षटके ज्यात फक्त दोन खेळाडू 30 यार्डच्या बाहेर असू शकतात नंतर चार खेळाडू बाहेर ठेवता येतात तर पुरुष संघाला दोन पॉवर प्ले असतात पहिला दहा षटकाचा दोन खेळाडू बाहेर आणि दुसरा ३१ ते ४० षटका दरम्यान पाच षटकांचा चार खेळाडू बाहेर.