Home latest News अलिबाग साहित्यसंमेलनात कवीमित्र रितेश घासे स्मृती काव्य कट्ट्याचे यशस्वी आयोजन

अलिबाग साहित्यसंमेलनात कवीमित्र रितेश घासे स्मृती काव्य कट्ट्याचे यशस्वी आयोजन

93

अलिबाग साहित्यसंमेलनात कवीमित्र रितेश घासे स्मृती काव्य कट्ट्याचे यशस्वी आयोजन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कलारंग सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा अलिबाग
यांच्या सहकार्याने दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच अलिबाग येथे
पार पडले.
संमेलनाचे वैशिठ्य म्हणजे सदर संमेलनात कवीमित्र रितेश घासे स्मृती काव्य कट्टा आयोजित करण्यात आला होतो. सदर काव्य कट्ट्यावर तरुणाईची काव्य मैफिल पार पडली.काव्यकट्ट्याच्या सुरवातीस प्रकल्प वाणी अध्यक्ष कलारंग यांनी रितेश घासे यांच्या स्मृतींना उजाळा देऊन सर्व उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.निवेदक म्हणून वैभव धनावडे यांनी भूमिका पार पाडताना जेष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे यांना नवोदितांस मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
विक्रांत वार्डे यांनी आपल्या गेय कवितेतून मैफलीची सुरवात केली. जीविता पाटील यांनी आई वडिलांचे प्रेम काव्यातून उलगडले ,रुपेश पाटील यांनी तफावतीची दिवाळी सादर करून वास्तक परिस्थिती काव्यातून मांडली.सुचिता साळवी,गायत्री तुळपुळे ,रंजिता गोवेकर,निरंकार पाटील,दीप्ती जोशी,विजय म्हात्रे,प्रणित थळे,आनंद पाटील या निमंत्रित कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या . संमेलन स्वागताध्यक्ष रमेश धनावडे आणि महेश कवळे यांच्या हस्ते निमंत्रित सहभागींना सन्मानित करण्यात आले. नाते संबंध,निसर्ग ,अध्यात्म ,समाजकारण,सामाजिक समस्या अश्या विविध विषयांवरील कविता संवेदनशील मनाचे प्रतिबिंब उलगडून गेल्या.रायगड मधील विविध कवी कवयित्रींनी सहभाग घेऊन उपस्थितांची वाहवा मिळवली.