Home latest News न्यायाधीश मंगेश धोत्रे यांचा जाहीर सत्कार…

न्यायाधीश मंगेश धोत्रे यांचा जाहीर सत्कार…

48

जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा गावचे सुपुत्र न्यायाधीश मंगेश धोत्रे यांचा जाहीर सत्कार आणि महामानवांची संयुक्त जयंती उत्सव संपन्न

प्रकाश सोनवणे

जुन्नर:-तालुक्यातील पिंपळगाव जोगा गावचे सुपुत्र न्यायाधीश मंगेश धोत्रे यांचा शनिवारी नऊ मे रोजी जाहीर सत्कार समारंभ निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या माळशेज घाटा जवळील महाबोधी विहारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने न्यायाधीश पदापर्यंत मजल मारून तालुक्याचे नाव मोठे केले असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राज्याचे उपाध्यक्ष संभाजी साळवे यांनी केले. तसेच जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे. पोपटराव शिंदे. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक कसबे. भवतु सब मंगलम संस्थेचे अध्यक्ष सुधीर शिशुपाल. प्रकाश फुलपगार. आदी अनेक मान्यवरांनी तसेच बौद्ध महासभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी न्यायाधीशांना मंगलमय शुभेच्छा दिल्या.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या संविधानाचे शिल्पकार व शिका संघटित व्हा संघर्ष करा. असा महामंत्र देणारे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अखिल विश्वाला शांतीचा संदेश देऊन मध्यम मार्गाचा अवलंब करून जीवन सुखी करण्याचा महामंत्र देणारे तथागत गौतम बुद्ध या महामानवांची संयुक्त जयंती ही माळशेज घाटाजवळील करंजाळे गावचे हद्दीत निसर्गरम्य वातावरणातील जागेत संपन्न झाली.

याप्रसंगी भवतु स. मंगलम संस्थेचे संस्थापक शांतू डोळस यांनी संस्थेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व हितचिंतकांना शुभेच्छा देऊन संस्थेची ४० वर्षाची यशस्वी वाटचाल याबाबत सविस्तर विवेचन केले. व न्यायाधीश मंगेश धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या व सांगितले की गेले एक महिनाभर तालुक्यामध्ये न्यायाधीशांचे विविध गावांमध्ये सत्कार होत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

या मंगलमय कार्यक्रमास सुरेश लोखंडे गुरुजी. गणेश रोकडे गुरुजी. संपत गायकवाड. दिलीप सोनवणे. अरविंद पंडित. अमित रोकडे. मंगल धोत्रे. प्रशांत धोत्रे. सोमनाथ शिंदे आधी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.