Home latest News अलिबाग नगरपरिषद निवडणुक शिवसेना उमेदवारांचा प्रचार सुरू

अलिबाग नगरपरिषद निवडणुक शिवसेना उमेदवारांचा प्रचार सुरू

205

अलिबाग नगरपरिषद निवडणुक शिवसेना उमेदवारांचा प्रचार सुरू

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संदिप पालकर व श्वेता पालकर निवडणूक लढवित आहेत. शनिवारी (दि.२२) पक्षांच्या महिला आघाडी तालुका संघटिका स्नेहल देवळेकर यांच्या हस्ते गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांसमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संदिप पालकर व श्वेता पालकर यांचे आव्हान असणार आहे.

संदिप पालकर व श्वेता पालकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मतदारांच्या घरोघरी जात संदिप पालकर व श्वेता पालकर यांनी आपला प्रचार सुरू केला. प्रचार फेरीत शिवसेना कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. पालकर यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.