सहावी लाटी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- जिल्हा क्रीडा संकुल नेहूली अलिबाग येथे दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सहावी लाटी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत जिल्हाभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता
या स्पर्धेत अलिबाग मार्शल आर्ट्स अकॅडमी अलिबाग संघाने सर्वात जास्त पदके पटकावून पहिल्या नंबरचे चषक पटकावले तसेच दुसऱ्या नंबरचे चषक न्यू विद्यामंदिर नागाव स्कूल ने पटकावले व तिसऱ्या क्रमांकाचे चषक आर्य एज्युकेशन गरुडपाडा स्कूल ने पटकावले
या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या सहाव्या लाठी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 साठी निवड झाली आहे
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग क्रीडा अधिकारी अंकिता पिळणकर उपस्थित होत्या. व लाठी रायगड असोसिएशन अध्यक्ष प्रमोद मसाळ, लाठी असोसिएशन रायगडचे सचिव प्रियांका गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा यशस्वी संपन्न झाली
व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाठी असोसिएशन रायगड सदस्य शुभम नखाते, संदेश सुर्वे, वेदांत सुर्वे, रुपेश शेळके व पंच सिद्धार्थ पाटील, रुद्राक्ष खारकर, नम्रता चव्हाण, वरद वर्तक, अनिकेत पाटील यांचे सहकार्य लाभले