Home latest News माणगांव रेल्वे स्थानकातुन पॅशन प्लस मोटारसायकल चोरीला

माणगांव रेल्वे स्थानकातुन पॅशन प्लस मोटारसायकल चोरीला

86

माणगांव रेल्वे स्थानकातुन पॅशन प्लस मोटारसायकल चोरीला

माणगांव रेल्वे स्थानकातुन पॅशन प्लस मोटारसायकल चोरीला

      ✍सचिन पवार ✍

        रायगड ब्युरो चीफ

    📞8080092301📞

 

माणगांव :- माणगांव रेल्वे स्टेशनं येथे फिर्यादी बळीराम देवराम कांबळे वय वर्ष 50 व्यवसाय नोकरी वनपाल वनविभाग रा.साईनाथ हेरिटेज प्लॅट नं.304 पनवेल तालुका पोलीस स्टेशनं जवळ ठाणा नाका रोड जुना पनवेल जि रायगड. सध्या राहणार जय जय रघुवीर समर्थ अपार्मेंट म्हसला ता म्हसला जि रायगड यांनी दि.20 सप्टेंबर रोजी आपली पॅशन प्लस मोटारसायकल क्र एम एच 06 ऐयु 3145 काळ्या व लाल रंगाची मोटारसायकल माणगांव रेल्वे स्थानकात पार्किंग करून ठेवली असता एका अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की 20 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 ते 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान मौजे माणगांव रेल्वे स्टेशनं ता. माणगांव जि रायगड येथून हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम एच 06 ऐयु 3145 काळ्या व लाल रंगाची तिचा इंजिन न MA01EB8GM02493 चॅसिंज न MBLHA10EL8GM02987

15 हजार रु किंमतीची मोटारसायकल एका अज्ञात इसमानी संमतीशिवाय स्वतःच्या फायदयाकरिता लबाडीच्या हेतूने चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्या विरुद्ध माणगांव पोलीस स्टेशनं विरुद्ध कॉ. गु. रजि. नं 273/2022 भा. द. वि. सं. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माणगांव पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पो नाईक धनावडे व सह पोलीस निरीक्षक आस्वर हे पुढील तपास करीत आहेत.