एक्सयुव्ही गाडीची कंटेनरला पाठीमागून धडक ; 2 ठार 5 जखमी
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र : 7715918136
पनवेल : पनवेल जवळील भंगारपाडा, पंकज पार्कींग समोरील जेएनपीटी-पनवेल येथील रोडवर एका एक्सयुव्ही गाडीने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हर्ष संतोष पाटील (21 रा.नेरुळ) हा त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची एक्सयुव्ही 700 क्र.एमएच-43-सीएम-8847 ही कार घेवून हयगयीने व निष्काळजीपणे चालवून समोरुन जात असलेल्या एका कंटेनरला पाठीमागून धडक मारुन झालेल्या अपघातात हितेंद्र पाटील (22), श्रीनाथ चंद्रशेखर (22) हे दोघे गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर चालक हर्ष पाटील याच्यासह इतर 5 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.