Home latest News होमगार्ड सैनिक प्रमोद वामन गोजे यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात...

होमगार्ड सैनिक प्रमोद वामन गोजे यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

87

होमगार्ड सैनिक प्रमोद वामन गोजे यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953

भिवापूर :- भिवापूर होमगार्ड समादेशक व इंदिरा कॉग्रेस सेवादलाचे माजी पदाधिकारी ५२ वर्षीय प्रमोद वामनराव गोजे राहणार -भिवापूर यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे आज दि. २५ फरवरी मंगळवारला सकाळी दुःखद निधन झाले. त्यांचा सामाजिक कामात कमालीचा वावर होता. त्यांना तिन दिवसा अगोदर कामठी येथील आशा हॉस्पीटल येथे प्रकृती व्यवस्थित नसल्याने भरती करण्यात आले होते. दि.25रोजी त्यांचे दुखद निधन झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना चार भाऊ एक बहीन आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे प्रमोद गोजे यांच्या पार्थिवावर मरू नदी येथील स्मशानघाटावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी होमगार्ड सैनिकाकडून त्यांना सलामी देण्यात आली. त्यांच्या दुःखद निधनाने शहर कॉग्रेस कमेटी अध्यक्ष दिलीप गुप्ता, ठाणेदार जयप्रकाश निर्मल,श्री विठ्ठल रुक्मीनी देवस्थाचे अध्यक्ष रमेश बोराडे, सचिव राजु सागरे यांनी शोक व्यक्त केला आहे.