Home latest News लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक 37 मधील कामगार कॉलनी येथे कचरा वर्गीकरणास...

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक 37 मधील कामगार कॉलनी येथे कचरा वर्गीकरणास प्रोत्साहन

94

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक 37 मधील कामगार कॉलनी येथे कचरा वर्गीकरणास प्रोत्साहन

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिका आणि 93.5 रेड एफएमचे आरजे आकाश यांनी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक 37 मधील कामगार कॉलनी येथे कचरा वर्गीकरणास प्रोत्साहन देण्याकरिता जनजागृती अभियान राबविले. या अभियानात नागरीकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले. योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत माहिती देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या सहयोगाने आयोजित जनजागृती अभियानात रेड एफएमचे आरजे आकाश यांनी नागरीकांशी स्वच्छतेबाबत संवाद साधला तसेच कचरा वर्गीकरणाबाबत जागरुक केले यावेळी लक्ष्मी नगरातील समस्त जनतेनी प्रोत्साहन दिले व नागपूर महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांकडून कचरा वर्गिकरना विषयी माहिती समजून घेतली.