माझे सर्व काही असेल ते विधवा म्हणून करायच, पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची आत्महत्या.

पिंपरी -: पतीच्या अनैतिक संबंधामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस तिच्या मृतदेहाचा पंचनामा करत असताना त्यांना तिच्या कपड्यामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने अशी काही मागणी केली होती की, तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.तिने चिठ्ठीत लिहिले होते की, ”माझी शेवटची इच्छा आहे की माझे सर्व काही असेल ते विधवा म्हणून करायचे आणि माझ्या कोणत्याच कार्यक्रमास तो नसावा़”. निगडी पोलिसांनी जयंत एकनाथ कांबळे वय 42, रा. पंचतारानगर, आकुर्डी याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी फिर्याद दिली आहे. रुपाली जयंत कांबळे वय 33, रा. पंचतारानगर, आकुर्डी यांनी 20 डिसेंबर रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेतल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले़. तेथे तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाचा पोलीस पंचनामा करीत असता त्यांना छातीजवळ ब्लाऊजमध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी आपल्या पतीचे बाहेर एका बाईशी संबंध होते म्हणून आपण स्वत:ला संपवत आहे, असे म्हणून आपले उत्तरकार्य एक विधवा म्हणून करावे व ते पतीने करु नये, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. यावरुन पोलिसांनी जयंत कांबळे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here